मालुंजा पशुवैद्यकीय दवाखाना मधील कर्मचारी श्री एकनाथ सुब्राम पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ

मालुंजा पशुवैद्यकीय दवाखाना मधील कर्मचारी श्री एकनाथ सुब्राम पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ
श्री एकनाथ सुब्राम पवार यांनी बेलापूर आरोग्य केंद्रात २० वर्षे सेवा केली. त्यानंतर पवार हे पशुवैद्यकीय दवाखाना मालुंजा मध्ये २०१६ मध्ये परिचर म्हणून रूजू झाले होते. ३१ डिसेंबर २०२२ ला सेवानिवृत्त झाले आहे.सदर मालुंजा गावात सहा वर्षे सेवा दिली.
पवार हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. शेतकरी वर्गाला शासकीय योजना बद्दल खूप माहिती देत असत.
जनावरे कडबा कुट्टी प्रकरणे ,लंपी आजार मध्ये रात्री- बेरात्री डॉक्टरांबरोबर फेरी मारणे,लसिकरण करणे, शेतकरी वर्गाला बी-बियाणे , औषधे वाटप करणे,
कधी कोणाशी वादग्रस्त वक्तव्य केले नाही.स्वभाव ही मनमिळाऊ होता , यामुळे मालुंजा ,लाडगाव व भेर्डापुर या तीन गावच्या ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय दवाखाना मालुंजा मध्ये परिचर श्री एकनाथ पवार यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
डॉ.वाक्चौरे यांनी आपले मनोगत केले .ते म्हणाले की पवार मामांनी लंपी ,लाळाखरकुत लसिकरणे मध्ये खूप सहकार्य केले आहे.पवार मामा ऑफिस मध्ये खूप स्वच्छता ठेवत असत व एक आमचा आदर्श होते.
सदर त्यावेळी उपस्थित मालुंजा गावचे सरपंच अच्युतराव बडाख , आबासाहेब बडाख ग्रा पं सदस्य मालुंजा, बाबासाहेब बडाख तंटामुक्ती अध्यक्ष, हरीभाऊ बडाख वि.का.से सोसायटी चेअरमन,
नामदेव बडाख, गोरक्षनाथ बडाख, मच्छिंद्र थोरे, निलेश बडाख, रामभाऊ काळे, सुनील थोरे, रावसाहेब क्षीरसागर ,इम्राहिम शेख, ज्ञानेश्वर परदेशी, पत्रकार आबासाहेब कुमावत, शिवाजीराव दांगट, सुनिल बडाख, डाॅ.वाक्चौरे डॉ.सिरसे, सखाहरी शेंडगे, दत्तात्रय जाधव,अभय शिंदे, सोन्याबाप्पू बडाख,ससाणे मामा,आदींची उपस्थिती होती.