दर्पण दिनानिमित्त मूकबधिर व मतिमंद विद्यालयात डिजिजिटल मिडियाच्यावतिने शालेय साहित्य वाटप.

दर्पण दिनानिमित्त मूकबधिर व मतिमंद विद्यालयात डिजिजिटल मिडियाच्यावतिने शालेय साहित्य वाटप.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी पत्रकारांना लेखणी भेट देऊन दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दि.६ शुक्रवार रोजी तालुक्यातील विविध ठिकाणी दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दर्पण दिनानिमित्त कै. भगवानराव ढोबळे मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयात डिजिजिटल मिडियाच्यावतिने शालेय साहित्य वाटप करून स्तुत्य उपक्रम राबवला.
यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या हस्ते या मतिमंद व मूकबधिर गरजवंतांना शालेय साहित्य वाटप केले. याचसह स्वप्निल राठोड यांनी सर्व पत्रकारांना लेखणीची भेट देऊन दर्पण दिनाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना अविनाश इंगावले यांनी या मूकबधिर व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी दोन महिन्यात एलसिडी भेट देण्याचा शब्द दिला.
कॉलेज जिवनापासून ते मनसे जिल्हा अध्यक्ष पदापर्यंत वेळोवेळी पत्रकार बांधवांनी नेहमीच सहकार्य केले असल्याचे मत व्यक्त करत दर्पण दिनानिमित्त पत्रकार यांना यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी शुभेच्छाह दिल्या.
यावेळी सुभाष शिंदे, देवराज कोळे, शाम जाधव, ज्ञानेश्वर हवाले, शेख जावेद, अमोल भांगे,ज्ञानेश्वर मुंढे, गणेश ढाकणे, अफरोज शेख, इम्रान सौदागर तसेच मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद पौळ यांनी केले तर आभार सोमनाथ मोटे यांनी मानले.