वर्षभर मोफत धान्य खर्च कसा भागवावा या विवंचनेत दुकानदार

वर्षभर मोफत धान्य खर्च कसा भागवावा या विवंचनेत दुकानदार
बेलापुर (प्रतिनिधी )-कोरोना काळातील अधिकचे मोफत धान्य शासनाने एक जानेवारी पासुन बंद केले असुन आता कार्डधारकांना वर्षभर माणशी पाचच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे मोफत धान्य वाटपामुळे आपला दैनंदिन खर्च कसा भागवावा अशा विवंचनेत स्वस्त धान्य दुकानदार सापडले आहेत
गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात केद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत माणशी पाच किलो धान्य मोफत देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता त्यामुळे विकतचे पाच किलो धान्य तर मोफतचे पाच किलो धान्य असे दर माह माणशी दहा किलो धान्य दिले जात असे आता एक जानेवारी पासुन शासनाने माणशी पाचच किलो धान्य देण्याचे जाहीर केले असुन ते धान्य वर्षभर मोफत दिले जाणार आहे
जिल्ह्यात १८०० धान्य दुकानदार असुन राज्यात ५५००० रेशन दुकानदार आहेत .धान्य मोफत वितरण करण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे आता दुकानदारांना धान्याकरीता पैसेच भरावे लागणार नाही तसेच कार्डधारकाकडून पैसेच घेता येणार नाही त्यामुळे आता दुकान भाडे विज बिल दैनंदिन खर्च घर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे .
दुकानदारांना धान्य वितरणामागे क्विंटलला दिडशे रुपये कमिशन दिले जात असुन त्यात वाढ करण्यात यावी तसेच धान्य वितरणाचे कमिशन दर महा दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे .