शुभांगीताई पाटील यांची पदवीधर साठी उमेदवारी……

शुभांगीताई पाटील यांची पदवीधर साठी उमेदवारी……
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून एकमेव महीला उमेदवार शुभांगी ताई पाटील सुर्यवंशी दिनांक १० जानेवारी रोजी नामनिर्देशन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
३० जानेवारी २०२३ रोजी येऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागातून नाशिक विभाग मतदार पदवीधर मतदार संघाच्या युवा महीला उमेदवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विभागीय आयुक्त कार्यालय येथे आपला नाम निर्देशक उमेदवारी अर्ज दाखल केला.या वेळी नाशिक,नगर , जळगाव, धुळे येथुन मोठ्या प्रमाणात शुभांगी ताई बरोबर अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नाशिक येथील जैन भवन येथे दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.
सोबत अडवोकेट विवेक सूर्यवंशी प्राध्यापक जसपाल सिंह जी सिसोदिया धुळे वकील संघाचे अध्यक्ष ऍड दिलीप पाटील हे देखील उपस्थित होते.