जनक्रांती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

September 18, 2023

जनक्रांती

डिजिटल न्यूज पोर्टल

जलजिवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाचे पाणी देणार — केंद्रीय मंञी प्रल्हादसिंह पटेल

 जलजिवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाचे पाणी देणार — केंद्रीय मंञी प्रल्हादसिंह पटेल

 

 

 

केंद्र सरकारची जलजिवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी संकल्पना आसुन २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाचे पाणी दिले जाणार आहे. पाण्याचीउपलब्धता करण्यासाठी नदीजोड हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कार्यकर्यांनी तळागाळातील नागरीकांशी संवाद वाढवुन लाभाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन केंद्रीय आन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंञी प्रल्हादसिह पटेल यांनी टाकळीभान येथे आयोजित भाजपा संघटनात्मक बुथ कमेटीच्या बैठकित केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोदकर, संघटन सरचिटनिस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दिपक पटारे, ओबीसी सेलचे प्रकाश चित्ते, माजी सभापती नानासाहेब पवार, शरद नवले, बबन मुठे, गिरधर आसने मान्यवर उपस्थित होते. 

      यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना मंञी पटेल म्हणाले कि, जलजिवन मिशनद्वारे प्रत्येक घरात मानसी ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. जगाच्या लोकसंख्येच्या १८ टक्के लोकसंख्या भारत देशाची आहे. त्यामानाने ४ टक्के एवढेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी नदीजोड हा महत्वकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला आहे. २०२४ पर्यंत खेड्यात व गावात घराघरात नळाचे पाणी या मिशन द्वारे पोहचवले जाणार आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला महत्व आसुन भविष्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्या पुन्हा वापर करण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आसल्याचे सांगुन ते म्हणाले कि, भाजपा हा जात धर्म न पाळणारा पक्ष आसुन नागरीकांना सुविधा देण्याचे काम करीत आसल्याचेही ते म्हणाले.

   यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेळेची शिस्त पाळली पाहीजे. लाभाच्या योजना तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत. बुथ कार्यकर्यांचा नागरीकांशी संवाद आसलाच पाहीजे. श्रीरामपुर विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

    यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील भाजपाच्या कामाचा आढावा मांडला. यावेळी ,जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर ,जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी ,तालुकाध्यक्ष दीपक अण्णा पटारे, ओबीसीचे सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश अण्णा चित्ते , माजी सभापती नानासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले , बबनराव मुठे, नानासाहेब शिंदे, विठ्ठलराव राऊत, गिरिधर आसने ,गणेश मुद्गुगुले, , युवा तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, नितीन भागडे, शंतनू फोपसे, सतीश सौदागर, मारुती बिंगले ,गणेश राठी ,प्रफुल्ल डावरे ,रुपेश हरकल ,महिला आघाडीच्या रेखाताई रिंगे , अनिता शर्मा,हरदास ताई ,सुप्रियाताई धुमाळ, मिलिंदकुमार साळवे, कृष्णा वेताळ, भाऊसाहेब पवार, अविनाश लोखंडे, राहुल पटारे, चंद्रकांत थोरात, भारत गुंजाळ, बुथ कमेटी सदस्य व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नारायण काळे यांनी तर सुञसंचलन मुकुंद हापसे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

लोकप्रिय बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ब्रेकिंग न्यूज

Website Designed by JCS 8380826758.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे