ज्ञानमाउलीचा वार्षिक क्रिडा महोत्सव.

ज्ञानमाउलीचा वार्षिक क्रिडा महोत्सव.
ज्ञानमाउली स्कूल घोडेगाव येथे वार्षिक क्रीडा सप्ताहास दि. 23 2023जानेवारी पासून प्रारंभ झाला आहे. यावर्षीची थीम “Team Work Makes Dream Work”ही घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिक्षक श्री. संदिप मिटके (DYSP), API माणिक चौधरी आणि SPI थोरात सर हे उपस्थीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानमाउली पूजन तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भारतीय हॉकीपटू ध्यानचंद ह्यांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन करण्यात आली. ज्ञानमाउली स्कूलचा अभिमान असलेला ध्वज माननीय श्री. सुहास गोंटे काका (शिक्षक- पालक संघटनेचे अध्यक्ष) ह्यांनी सन्मानपूर्वक फडकवला. तद्नंतर ९वी व १० वी वीच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर केली व झेंड्याला प्रणाम करत मान्यवरांना सलामी दिली. क्रीडासप्ताहाची सुरुवात म्हणून शाळेच्या प्रांगणातून बाल क्रिडाअध्यक्ष विद्यार्थ्यांसमवेत हेड बॉय आणि हेड गर्ल ह्यांनी मशाल फेरी घेतली. आणि त्याचद्वारे अध्यक्षांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ह्या कार्यक्रमात बाळ गोपाळानी क्रिडा नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आभारप्रदर्शनानंतर DYSP संदीप मिटके साहेब तसेच API चौधरी साहेबानी व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल खेळून मैदानी स्पर्धेचे उद्घाटन केले. ह्यावेळी शाळेचे मॅनेजर फा. सतीश कदम, शाळेचे मुख्याध्यापक फा. डॉमिनिक ब्राम्हणे ह्यांनी पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कर्डिले सर व श्रीमती अंजनी राशीनकर मॅडम ह्यांनी अगदी सुव्यवस्थित केले असून विविध मान्यवरांनी खेळाचे महत्व व चालू वर्षाच्या थीमनुसार टीम स्पिरिट संघ एकता जातन आव्हान केले