बेलापुरात खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन पहीले बक्षिस ५१ हजार रुपयाचे

बेलापुरात खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन पहीले बक्षिस ५१ हजार रुपयाचे
बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर बु ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षाचे औचित्य साधून गावकरी मंडळाच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील चषक खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन प्रथम क्रमांकास रुपये ५१ हजार द्वितीय क्रमांकास रुपये ४१ हजार तृतीय क्रमांकास रुपये ३१ हजार चतुर्थ क्रमांकास रुपये २१ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहीती मा .जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली आहे. गावकरी मंडळाच्या वतीने खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन दिनाक ४ व ५ फेब्रुवारी रोजी या स्पर्धा भरविण्यात येणार आहे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघास गावकरी मंडळाच्या वतीने ५१ हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या संघास चव्हाण कन्स्ट्रक्शन श्रीरामपुर यांच्या वतीने ४१ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकाच्या संघास सुरेश शिंदे बेलापुर यांच्या वतीने ३१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे चतुर्थ क्रमांकाच्या संघास सामाजिक कार्यकर्ते शफीक आतार यांच्या वतीने २१ हजार रुपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे तसेच उत्कृष्ट संघास बाळासाहेब दाणी यांच्याकडून ५१००रुपये रोख तर उत्कृष्ट चढाई पटुस देवा गृपच्या वतीने ५१०० रुपये बक्षिस देण्यात येणार आहे साई फर्निचर रामगड यांच्या वतीने उत्कृष्ट पकडपटु करीता ५१०० रुपये तर कृष्णा कलेक्शनच्या वतीने उत्कृष्ट खेळाडूस ५१०० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे.स्पर्धेसाठी रुपये ७०० प्रवेश फी ठेवण्यात येणार आहे.सामने दिवस रात्र खेळविण्यात येणार असुन स्पर्धा मँटवर खेळवीली जाणार आहे स्पर्धेत भाग घेवु ईच्छिणाऱ्या संघानी शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी दुपारी एक वाजेपर्यंत रिपोर्टींग करणे आवश्यक असेल खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकाकडून केली जाणार असुन एका खेळाडूस एकाच संघात खेळता येईल तसेच पंचाचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनीश्री. अनिल पटारे सर मो.९४२२२९०३९३,श्री.गिताराम पवार सर
मो.९४०३७०१००७,श्री. सतिश सोनवणे मो.८९८३६३६३८३,श्री. बंटी शेलार मो.९८३४३८०९३५,
श्री.मयुर जाधव मो.९३७०८४४८९६,
श्री.विकी अमोलिक मो.८३२९३७५४१९,
श्री.मोईन शेख मो.७३५०२३३०१५ यांच्याशी संपर्क करावा.
तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे आसे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तसेच गावकरी मंडळ यांनी केले आहे.