माधवबागचा विजयी सोहळा अद़्भूतच -सारंगधर निर्मळ

माधवबागचा विजयी सोहळा अद़्भूतच -सारंगधर निर्मळ
श्रीरामपूर- जीवनशैलीत बदल करून आयुर्वेदिक पद्धतीने रोगमुक्त करण्याचे काम जे माधव बागकडून होत आहे, त्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान कनेक्टचे संचालक श्री. सारंगधर निर्मळ यांनी माधवबाग आयोजित हृदयरोग व मधुमेह विजयोत्सव’ या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांनी लाखमोलाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच माधवबागचा हा रुग्णांसाठी चा विजयी सोहळा म्हणजे अद्भूतच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
‘पाश्चिमात्य संस्कृतीचा केलेला अवलंब, जीवनपद्धती मध्ये झालेले बदल यांमुळे भारत आज मधुमेहामध्ये खुप पुढे असल्याची शोकांतिका कार्यक्रमाचे उद्घाटक आचार्य श्री. महेशजी व्यास यांनी मांडली. पुढे ते म्हणाले ‘आयुर्वेदामध्ये असलेली शक्ती आज माधवबाग मुळे हृदयरोग व मधुमेहातून पूर्णपणे मुक्त झालेल्या रुग्णांच्या विजयी सोहळ्याकडे बघून लक्षात येते. माधव बागची उपचार पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना बरे करण्याच्या ताकदिचे आचार्यांकडून कौतुक झाले. भिऊ नकोस माधवबाग आपल्या पाठिशी आहे, तुम्हाला रोगमुक्त करण्याची ताकद माधवबाग मध्ये आहे, असे मार्गदर्शन श्री. व्यास यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून या विजयी सोहळ्यात पत्रकार बांधवांचा सम्मान सोहळाही साजरा केला गेला. उपस्थित पत्रकार बांधवांनीही विजयी रुग्णांना शुभेच्छा दिल्या.
माधवबागच्या हृदयरोग मधुमेह मुक्ती सोहळ्याची पार्श्वभूमी श्री. अनंत नेरळकरांनी प्रास्ताविक द्वारे समजावून दिली. तसेच या कार्यक्रमामध्ये श्री अनिल कोरडेंनी आयोजनामध्ये सहकार्य केले. माधवबागचे झोनल मेडिकल हेड श्री. बिपीन गोंड यांनी घरबसल्या स्वतःच्या मोबाइलवर आपले हृदयस्वास्थ्य तपासणाऱ्या माधवबागच्या ‘ हार्ट हेल्थ मीटर’ या संकल्पनेची माहिती दिली. माधवबाग श्रीरामपूर शाखेच्या क्लिनिक हेड डॉ. भावना सोमाणी यांनी रुग्ण कसे बरे होतात, याबाबत माहिती दिली. अनेक रुग्णांनी – हृदयरोग- मधुमेह मुक्तीच्या प्रवासाचे तर काही अतिवजनातून, वातव्याधीतून मुक्त झालेल्या रुग्णांनीही आपल्या रोग मुक्तीच्या प्रवासाचे वर्णन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री. विजय साळुंके, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. चेतन भुतडा उपस्थित होते. सोशल सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज सूर्यवंशी, बबनराव तागड, आनंद पवार, डॉ. सचिन पन्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैलास सोमाणी व डॉ. प्रशांत याकुंडी यांनी सांभाळले. कार्यक्रमासाठी औरंगाबाद, वैजापुर, कोपरगाव, राहुरी, लोणी, बेलापूर येथूनही रुग्ण व नागरिकांची, विजयवीरांची उपस्थिती होती. कार्यक्रमास सोशल सर्व्हिस फाउंडेशनचे व सूरज सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले. आभार प्रदर्शनाची धुरा डॉ. भावना सोमाणी यांनी सांभाळली.