शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पञकारांचे योगदान मोठे – रामदास शिंदे

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पञकारांचे योगदान मोठे – रामदास शिंदे
टाकळीभान प्रतिनीधी – पञकारांच्या लेखनीमुळेच ग्रामिण भागातील शेतकरी वर्गास गारपीट, अतिवृष्टी, नुकसान भरपाई मिळाली असुन शेतकरी वर्गासाठी ग्रामीण पञकारांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन भोकर काँगेसचे अध्यक्ष रामदास शिंदे यांनी स्व.जयंतराव ससाणे सभागृहामध्ये जगदंबा युवा प्रतिष्ठाण व भोकर विविध कार्यकारी सेवा सोसायटी आयोजीत पञकार दिन कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ आण्णासाहेब चौधरी होते. यावेळी जगदंबा युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गणेश छल्लारे व सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब विधाटे यांचे संयुक्त विद्यमाने टाकळीभान, भोकर, माळवाडगांव व वडाळा महादेव येथील पञकारांचा सन्मान, सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुंजाहारी शिंदे, महेश पटारे, गणेश छल्लारे, सुदाम पटारे यांची भाषणे झाली.
यावेळी शिंदे म्हणाले की ग्रामीण भागाच्या विकासात तसेच शेतकरी समस्येसाठी, प्रश्नासाठी
ग्रामीण पञकारांची लेखनी सतत प्रभावीपणे बातम्यांच्या माध्यमातुन पाठपूरावा करत शासनाला जागे करण्याचे काम पञकार करत असतात असे शिंदे यांनी सांगीतले.
जगदंबा युवा प्रतिष्ठाणचे गणेश छल्लारे म्हणाले की राजकीय , सामाजीक, कृषी क्षेञामध्ये पञकारांचे योगदान मोठे असुन पञकारदिनी त्यांचा सन्मान दरवर्षी करण्याचा मानस आपला असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब विधाटे, अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, कारभारी तागड, नारायण पटारे, सुरेश अमोलीक, राजेंद्र चौधरी, नानासाहेब जगदाळे, गंगामामा गायकवाड, सागर अमोलीक, आण्णासाहेब काळे, उपसरपंच महेश पटारे, भावराव सुडके, सागर शिंदें, राजेंद्र विधाटे, राहुल अभंग, सुदाम पटारे, संजय डुकरे, दत्ताञय पटारे, निलेश विधाटे, पप्पू थोरात, वेणुनाथ डुकरे, यांचेसह सोसायटी संचालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्थावीक, सुञसंचालन व आभार कामगार नेते गणेश छल्लारे यांनी केले.