जनक्रांती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

September 18, 2023

जनक्रांती

डिजिटल न्यूज पोर्टल

झेंडावंदनासाठी जाताना चार विद्यार्थ्यांचा भिषण अपघात: धावत्या मोटरसायकलवर रिल बनवणे अंगलट

झेंडावंदनासाठी जाताना चार विद्यार्थ्यांना धावत्या मोटरसायकलवर रिल बनवणे अंगलट:भिषण अपघात

 झेंडावंदनासाठी जाताना चार विद्यार्थ्यांचा भिषण अपघात: धावत्या मोटरसायकलवर रिल बनवणे अंगलट

 

पाथरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये झेंडावंदनासाठी जाताना चार विद्यार्थ्यांना धावत्या बाईकवर रिल्स बनवणे अंगलट आले आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने ऑटो सोबत भीषण अपघात झाला. यात चारही विद्यार्थी जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा भीषण अपघात आज सकाळी 6. 45 वाजेच्या दरम्यान पाथरी ते सोनपेठ मार्गावर शाळेच्या अगदी जवळ झाला.

 

पाथरी ते सोनपेठ रस्त्यावर श्री चक्रधर स्वामी खाजगी शाळा आहे. या शाळेत डाकूपिंप्री ता पाथरी येथील अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गावातील 9 व्या वर्गात शिकणारे चौघे स्वप्नील ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल महादू तिथे , योगानंद कैलास घुगे ,शंतनू कांचन सोनवणे सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास शाळेकडे निघाले होते. चौघे एकाच बाईकवर जात असताना रिल शूट करत होते. शाळेच्या जवळ आले असता एका हातात मोबाईल आणि एका हाताने बाईक चालवताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. याचवेळी समोरून येणाऱ्या पीकअप रिक्षाने बाईकवरील चौघांना उडवले. यात चौघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले. आजूबाजूच्या नागरिकांनी लागलीच त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथे रवाना केले. दोघे अत्यवस्थ असून यातील एका विद्यार्थ्यास लातूर येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.

 

5/5 - (2 votes)

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ब्रेकिंग न्यूज

Website Designed by JCS 8380826758.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे