जनक्रांती न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

September 25, 2023

जनक्रांती

डिजिटल न्यूज पोर्टल

ट्रकचा टायर फुटल्याने धारणी जवळ भीषण अपघात सहा लोक जागीच ठार तर बारा लोक गंभीर जखमी

ट्रकचा टायर फुटल्याने धारणी जवळ भीषण अपघात

सहा लोक जागीच ठार तर बारा लोक गंभीर जखमी

अपघातात ६ जनांचा जागीच मृत्यू 

टाकळीभान प्रतिनिधी -धारणी पासून लागून असलेल्या देड तलाई ते शेखपुरा मार्गाने खंडव्याकडे जाणाऱ्या पिकअप वाहनातील ५ जणांचा बुधवारी दुपारी २:३० च्या सुमारास देड तलाई ते शेखपुरा दरम्यान असलेल्या तापी नदीच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात ६ जनांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर १२ जण गंभिर जखमी झाले आहेत.याशिवाय पिकअप वाहनातील इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.सर्व जखमींना खाकणार तहसीलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या सोबतच पंचनामा करून सर्व मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार,बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ट्रक क्रमांक-एम.पी.०९,के.डी.१७२३ हा ऊस भरून खंडव्याहून देड तलाई चा दिशेने जात होता.त्याचवेळी पिकअप वाहन क्रमांक-एम.एच.४८,टी-४५०९ मध्ये सुमारे २० ते २२ मजूर देड तलाई येथून स्वार होऊन खंडव्याकडे जाण्यासाठी निघाले होते.हि दोन्ही वाहने तापी नदीच्या तलावाजवळ पोहचली.त्यानंतर उसाने भरलेल्या ट्रकच्या टायर अचानक फुटला आणि ट्रक नियंत्रणा बाहेर गेला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला धडक दिली.हि धडक इतकी भीषण होती की,पिकअप वाहनाचा पुढील भाग चकनाचुर झाला.या सह पिकअप वाहनात प्रवास करणाऱ्या ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.त्याचवेळी वाहनातील १२ जण गंभिर जखमी झाले आहे.पार्वती रामसिंग दिनकर(३२,सुंदरदेव),नंदिनी रामसिंग दिनकर,(१२,सुंदरदेव),दुर्गा कालू तांडीलकर(१४,सुंदरदेव),रमेश मंगल कोरकू(३५,सुंदरदेव),जामवंती रमेश कोरकू(३०,सुंदरदेव),अशी मृतांची नावे आहेत.या अपघातात बसंती श्रीराम(४५,सुंदरदेव)गणेश रामचरण (१०,सुंदरदेव)चारसिंग कांशीराम (०७,नागोतार)रवींद्र रमेश(१०,नागोतार),गुणीबाई रामचरण (४८,नागोतार),रामसिंग मोतीलाल(४०,सुंदरदेव) कोशल्या श्रीकेश(१५,सुंदरदेव)जगणकमल (१३’सुंदरदेव),आणि चंदाबाई नानक राम (३५,सुंदरदेव)हे गंबीर जखमी झाले.या अपघाताची माहिती मिळताच देड तलाई चौकी व खाकणार पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्याचवेळी घटनास्थळ मध्यप्रदेशाचा हद्दीत असल्याने खाकणार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या सोबतच अपघातात जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी खकणारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.खकणार पोलिसांनी ट्रक चालाकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ब्रेकिंग न्यूज

Website Designed by JCS 8380826758.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे