शेतकऱ्यांचे वीज बिल शासनाने भरावे : राष्ट्रीय समाज पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

शेतकऱ्यांचे वीज बिल शासनाने भरावे : राष्ट्रीय समाज पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
महावितरणने शेतकऱ्यांचे शेतीचे वीज कनेक्शन कट नकरता वीज पुरवठा शेतीसाठी १२ तास दिवसाला सुरळीत करावा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांनी विरोधी पक्षनेते असताना मध्यप्रदेश सरकार प्रमाणे महाराष्ट्रातील सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल भरावे अशी मागणी केली होती आता ती त्यांनी पूर्ण करावी अशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मागणी आहे.
१) शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल संपुर्णपणे माफ करावे.
२) शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास वीज देण्यात यावी.
३) शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्यात यावी.
आणि शेतकऱ्यांचा बंद केलेला वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा.
अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन तहसीलदार कार्यालय, उपविभाग कार्यालय आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल आणि होणाऱ्या परीणामास शासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदभाऊ बाचकर,अ,नगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे,राहुरी तालुका अध्यक्ष शिवाजी सरक ,तालुका उपाध्यक्ष उमेश बाचकर,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बिलाल शेख,युवक तालुकाध्यक्ष करण माळी,बापूसाहेब विटनोर,पोपट विटनोर, आण्णासाहेब सरोदे, आण्णासाहेब कोळेकर, आप्पासाहेब विटनोर,विजय कोळसे, भारत हापसे,अभिमन्यू बाचकर, शिवाजी कोळसे आदी उपस्थित होते