दिव्यांगाची सेवा करण्यासाठी मनात भूतदया असणे गरजेचे.

दिव्यांगाची सेवा करण्यासाठी मनात भूतदया असणे गरजेचे.
श्रीरामपूर : दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी व सामाजिक अभिसरण चळवळीच्या माध्यमातून दिव्यांगाना स्वाभिमानी जीवन व्यतीत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेले आसान दिव्यांग संघटना व अपंग सामाजिक विकास संस्था सर्व पदाधिकारी नक्कीच पुण्यकर्माचे मानकरी आहेत.दिव्यांगाची सेवा करण्यासाठी मनात भूतदया असणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून अन्नछत्रचे संचालक सतिष कुंकलोळ यांनी केले
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंती निमित्त व स्व.काशिनाथ कानडे यांच्या स्मरणार्थ मोफत पाणपोई उदघाटन व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश जाधव, नक्षत्र कलेक्शनचे संचालक अरुण कतारे,अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,सचिव वर्षा गायकवाड, महावितरणचे सागर गायकवाड,रिपाइं विभागीय जिल्हाध्यक्ष भिमराव बागुल, श्रीमती अलका कानडे,आसान दिव्यांग संघटना प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी,महिला प्रदेशाध्यक्ष सौ स्नेहा कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष सुनील कानडे, राज्य समन्वयक विनोद कांबळे सर, अँड.प्रमोद सगळगिळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आसान दिव्यांग संघटनेच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही पाणपोई उदघाटन प्रसंगी उदघाटक सामाजिक कार्यकर्ते योगेश जाधव यांनी केले.याप्रसंगी भिमराव बागुल व अरुण कतारे यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित दिव्यांग व्यक्तींना, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साळवे यांनी केले सुत्रसंचालन मुश्ताकभाई तांबोळी यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष विश्वास काळे यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल कानडे, विश्वास काळे, शाखाध्यक्ष सौ.विमल जाधव, उपाध्यक्ष महेन्द्र दिवे,सोमवंशी, दत्तात्रय चव्हाण,मोमीन शेख, सविता मैड,गणेश बनसोडे,जाॅन मनतोडे,सौ संगिता वाघ, संदिप भोंगळ इ.नी विशेष परिश्रम घेतले