राहुरी तालुक्यातील सहकारी संस्था देशोधडील लावण्याच काम विरोधक करतात / अरुण तनपुरे

राहुरी तालुक्यातील सहकारी संस्था देशोधडील लावण्याच काम विरोधक करतात / अरुण तनपुरे
राहुरी तालुक्यातील राहुरी बाजार समिती निवडणूकीच्या पाश्वभूमीवर राहुरी खुर्द राजेश्वर मंदिराच्या प्रांगणात राहुरी खुर्द ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे संचालक व काही प्रमुख कार्यकर्त्यांन मध्ये प्रमुख बैठक घेण्यात आली यामध्ये मा सभापती अरुण तनपुरे यांनी आपण केलेल्या मागच्या कामाचा एक लेखा जोखा मांडून एक आर्दश मार्कट कमेटी चालवत आहे. पण विरोधकांनी एवढा मोठा तनपुरे सहकारी कारखाना कर्जाच्या खाईत लोटला आहे त्यामुळे विरोधकांना राहुरी तालुक्यातील सहकारी संस्थेचे काही ही घेणे देणे नाही त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन मतदान करावे असे आवाहन च तनपुरे यांनी मतदारांना केले आहे,
यावेळी मा,उपनगध्यक्ष् ताराचंद तनपुरे, ज्येष्ठ नागरिक गेणभाऊ तोडमल, मा सरपंच ईमामभाई शेख, दत्ता कवाणे, आण्णासाहेब बाचकर, अशोक तोडमल, राहुकाका तनपुरे, दिपक तनपुरे, रावसाहेब तोडमल, भास्करराव तोडमल, मा, सरपंच मधुकर साळवे, पं स उपसभापती प्रदीप पवार, गंगाराम शेडगे, ग्रा पं सदस्य पोपट चोपडे, अश्विनीताई कुमावत, असफ पठाण, आयुबभाई पठाण, पुंजा आघाव, दिपक शेडगे, रफिकभाई शेख, मनोज फोकसे, शिवाजी पवार, डॉ अनिल कदम सुदाम माळी, मुंकुद शेडगे, मुकिंदा शिंदे, वसीम शेख, अदि गामस्थ उपस्थित होते
माजी सरपंच स्व निर्मलाताई मालपाणी यांचे चिरंजीव पप्पूशेठ मालपणी हे राहुरी खुर्द जनसेवा मंडाळाच्या अध्यक्ष झाल्यापासून जनसेवा मंडाळात एक नव चैतन्य निर्माण झाले आहे आम्ही तनपुरे च्या पाठीशी उभा राहू अशी एक प्रकारे ग्वाही दिली आहे