माझ्या आईवडिलांना आमच्या धर्मातील लोकं त्रास देतील एकीकडे हे विचार डोक्यात तर आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलेल्या आकाश बरोबर सुखी संसाराचे स्वप्न बघत तीन दिवसांपूर्वी घर सोडलेली नाजनीन काल सौ.हिंदवी होऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जोडीदारासह हजर

माझ्या आईवडिलांना आमच्या धर्मातील लोकं त्रास देतील एकीकडे हे विचार डोक्यात तर आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलेल्या आकाश बरोबर सुखी संसाराचे स्वप्न बघत तीन दिवसांपूर्वी घर सोडलेली नाजनीन काल सौ.हिंदवी होऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जोडीदारासह हजर झाली.*
उच्चशिक्षीत बावीस वर्षीय नाजनीन धर्माचे सर्व बंधने तोडून बरोबरीने शिक्षित असलेल्या आकाशच्या प्रेमात पडली.घरच्या विरोधाला न जुमानता आकाशची धर्मसंस्कृती आचार विचारांना भाळलेली नाजनीन आकाशमध्येच आपलं सर्वस्व पाहत होती.दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागलेल्या नाजनीन च्या घरच्यांनी आकाशच्या घरी जाऊन धमक्याही दिल्या पण “मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी” या उक्तीप्रमाणे नाजनीनने चार दिवसांपूर्वी घर सोडून आकाश बरोबर दोनाचे चार केले. मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात दिली तर दुसरीकडे नाजनीन आणि आकाशने सर्व हिंदू रितीरिवाजाने धार्मिक विधीने छत्रपती संभाजीनगर येथे शुभविवाह केला.काल पोलीस ठाण्यात नवविवाहित जोडी येण्याची माहिती समजताच सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गर्दि केली होती.तर पोलीस ठाण्याच्या बाहेर इतरत्र पसरून शेकडो हिंदुत्ववादी धर्मरक्षक सावध पवित्र्यात उभे होते.सज्ञान मुलीने घेतलेला निर्णय योग्य असून मुलाच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची संपूर्ण जबाबदारी उपस्थित संघटनांनी घेतली असून मुलाला धमकी देणे मारहाण करण्यासारखे प्रकार झाल्यास अशास तसे उत्तर देण्यात येईल असा ईशारा राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैय्या बेग यांनी दिला आहे.
मुलगी सज्ञान असल्याने तिने घेतलेला तिच्या आयुष्याचा निर्णय भारतीय कायद्याने योग्य असल्याने कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी केले आहे.