कर्तबगार अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीने नागरिकांमध्ये नाराजी*

*कर्तबगार अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीने नागरिकांमध्ये नाराजी*
*पुन्हा बेशिस्त वाहनचालकाच्या नाहक त्रासला बळी पडण्याची भीती*
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झालेल्या आहेत. त्याच अनुषंगाने नवीन निरीक्षक,उपनिरीक्षक, पोलीस सहाय्यक निरीक्षक, यांच्याही नवीन नियुक्त म्हणुन समावेश अंतर्गत बदलीमार्फत करण्यातआलेला आहे.
आळंदी मध्ये सिंघम नावाने परिचित असलेल्या एका कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याची अचानक यात बदली झालेली आहे. आपल्या कामाने नागरिकांच्या मनावर ठसा उमटवण्यात सदर अधिकारी यशस्वी ठरले होते. मुळात चांगले काम केले म्हणून बदली होण्याची ही घटना याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या अधिकाऱ्याच्या बिनधास्त स्वभावामुळे बेशिस्त वाहनचालकांनी याबाबत धसका घेतला होता. ट्रिपल सीट टू व्हीलर वर प्रवास करताना तरुण वर्ग दहा वेळा विचार करत होता.तसेच रस्त्यावरील खड्डे सुद्धा या अधिकाऱ्याने स्वतः थांबून बुजवले होते की जेणे करुन रास्ता वाहता रहावा.बुलेटच्या कर्णकर्कश्य सायलेन्सर वर धडक कारवाई ही केली होती.बेशिस्त दुचाकीवर पोलीस शिपायांना न जुमानता त्रास देणाऱ्या प्रत्येकाचा चांगला हिशोब हे अधिकारी घेतअसत. तसेच बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असा संदेश देत. सज्जनाला आपुलकी वाटावी दूरजनाला कर्दनकाळ वाटावा असा पोलीस आळंदीकर नागरिकांच्या समोर ज्यांनी उभा केला. त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांची अंतर्गत बदली मुळे नियंत्रण कक्षात करण्यात आलेली बदली नागरिकांच्या पचनी पडलेली नाही. नियंत्रण कक्षामध्ये सदर शहाजी पवार यांची बदली करण्यात आल्यामुळे आळंदीकर नागरिकांमध्ये तीव्र नापसंती आणि नाराजी आहे. मुळात आळंदीतील वाढत्या वाहतुकीला आळा बसवणे आणि बेशिस्त दुचाकी स्वराने तर शहाजी पवार नावाचा धसकाच घेतला होता. अशी परिस्थिती असताना अचानक नियंत्रण कक्षात झालेली बदली ही नागरिकांच्या मनाला रुचलेली नाही. कारण आळंदीला बकालपणा आणणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार हे नेहमी तत्पर असायचे. चार चाकी वर मगरुरी करत रस्त्यात पार करणाऱ्या गाड्या असो किंवा आमदार खासदारांची नावे सांगून देशील तर वागणारे चार चाकी वाहक असतात कोणीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्या कायद्याच्या कचऱ्यातून कधीही सुटले नाही.साध्या सामान्य माणसाने एखादा फोन जरी केला तरी त्या गोष्टीची शहानिशा करत गुन्हेगाराला शासन होण्यासाठी शहाजी पवार यांनी नेहमी कार्य तत्परता दाखवली. अशी अनेक उदाहरणे आहेत. आळंदीकर नागरिक दिघी आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्या कामाचे कौतुक करत असतानाच अचानक अंतर्गत बदलीने आळंदीकर ग्रामस्थ नागरिकांचा हिरमोड झाला मुळात चांगल्या कामाची अशी कशी पावती अशी चर्चा सुरू झालीय.आळंदीमध्ये शिस्त लावणाऱ्या एका अधिकाऱ्याला त्या ठिकाणी ठेवणे गरजेचे असताना.बदली करणे याबाबतही मोठ्या प्रमाणात नापसंती व्यक्त करण्यात येत आहे.मुळात वेळप्रसंगी पाऊस ऊन वारा याचा विचार न करता रस्त्यावर उभे राहत. पोलीस शिपायाची वाट न पाहत स्वतः कार्य तत्परतेने शासन करण्यासाठी आणि कायदा मोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शहाजी पवार हे एक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. अंतर्गत नियंत्रण कक्षात बदली झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी याबाबत व्यक्त होत आहे तसेच चांगल्या कामाचं फळ हे आळंदी मध्ये असे मिळतं का याबाबतही भाविक नागरिकांमध्ये चर्चा आहे. शहाजी पवार यांची पुन्हा आहे त्याच ठिकाणी म्हणजे दिघी आळंदी वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून शहाजी पवार यांची जागा रिक्त राहिली तर मात्र आळंदीला पुन्हा बेशिस्त वाहतुकींना सामोरे जावे लागेल.
नागरिकांमध्ये जो शहाजी पवार नावाचा वचक आहे. शिस्त आहे. ती मोडली जाईल. आणि बकालपणाला वाव मिळेल. अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.अंतर्गत बदलीच्या शेड्युलमध्ये नियंत्रण कक्ष म्हणून झालेली बदली ही आळंदीकर नागरिकांना रुचणारी नाही. पर्याया ने शिस्त लावणे कामी आळंदी पोलिसांना या बदलीने नुकसानच होईल. याबाबत शाश्वती वाटते. आळंदीत सिंघम म्हणून शोभेल अशी कामगिरी असताना. चांगल्या कामाचं कौतुक करण्याऐवजी शिक्षा म्हणून बदली केली की काय अशी चर्चा मात्र सगळीकडे चालू आहे